Global Warming | मराठवाडा आणखी तापणार, पाऊसही वाढणार !

हवामान बदलावर ‘सीएसटीपी’ ने केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष
temprature
temprature
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यात उन्हाळ्यातील तापमान एक ते दोन अंशांनी तर आठ जिल्ह्यांत सरासरी पाऊस ८ ते २१ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी ॲण्ड पॉलिसी (Centre For Science, Technology And Policy) या संशोधन संस्थेने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. त्यात मराठवाड्यातील ही स्थिती असेल. राज्यात उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील ३० वर्षांच्या (१९९१-२०१९) तुलनेत २०२१-२०५० या काळात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पाऊस आणि अतिपावसाचे दिवस, प्रमाण वाढणार असल्याचेही पूर्वानुमान संस्थेने काढले आहे. बदलत्या हवामानाचे (Global Warming) गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकासकामांवर होणार असल्याचे या संस्थेने म्हटले आहे, अशी माहिती पर्यावरण, हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. (Global Warming Will Impact On Marathwada, Rain To Be Increase)

temprature
बजरंगबलीला दलित म्हटल्याप्रकरणी योगींना न्यायालयाची नोटीस

संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी जानेवारी २०२२ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या आयएमडी आणि आयपीसीसी आकडेवारीवरून १९९१ ते २०१९ या ३० वर्षांच्या अभ्यासातून २०२१ ते २०५० या दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या पश्‍चिम राज्यातील हवामान बदलाचा अंदाज व्यक्त केला आहे. आयएमडीची आकडेवारी, कोरोडेक्स मॉडेलच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्हानिहाय अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. आधीच हवामान जोखीम निर्देशांकात भारत सातव्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात तिसरा आहे. त्यामुळे हा अहवाल धोक्याची सूचना देत आहे. (Global Warming Impact On Marathwada)

सरासरी पाऊस वाढणार

मराठवाड्यात सरासरी पावसाचे प्रमाण वाढणार आहे. औरंगाबाद (Aurangabad) -९ ते १७ टक्के, जालना-९ ते १६, बीड-१७ ते २३, हिंगोली-१८ ते २२, परभणी-७ ते १६, उस्मानाबाद-८ ते १८, लातूर-१३ ते १७, नांदेड-७ ते २३ टक्क्यांनी हे प्रमाण वाढेल, असे अहवाल सांगतो.

temprature
तापमान पट्टी

तापमान वाढणार

औरंगाबादेत उन्हाळ्यात १.१ ते २.१ तर हिवाळ्यात १.४ ते २.३ अंशांनी तापमान वाढेल. अन्य जिल्ह्यांत अनुक्रमे उन्हाळा व हिवाळ्यात होणारी तापमान वाढ अंशांत अशी; बीड : १.२ ते १.६- १.२ ते २.१, हिंगोली : १.२ ते २.२- १.८ ते २.५. जालनाः १.३ ते २.७- १.१ ते २.६. लातूर : १.४ ते १.८- १.० ते १.६. नांदेड : १.० ते २.० - १.१ ते २.४. उस्मानाबाद : १.४ ते १.८ - १.३ ते १.९. परभणी : १.२ ते १.४- ०.३ ते १.१.

हवामान बदलाचा धोका

प्रदूषण वाढत राहिले तर २०२१-२०५० पर्यंत तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढेल. राज्यात उन्हाळ्यातील तापमानात ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढ होईल तर हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र व विदर्भात तापमानवाढ जास्त होईल. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात हिवाळ्याचे तापमान मात्र कमी होईल.

temprature
..अखेर पेट्रोल-डिझेल दरवाढीनं गाठला मुहूर्त; तब्बल साडेचार महिन्यानंतर इंधन दरवाढ

औष्णिक वीज प्रकल्पांतून उत्सर्जित होणारे वायू आणि जलप्रदूषण कमी करणे, ग्रामीण, शहरी भागांसह औद्योगिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढविणे, जलसाठ्यात वाढ, निसर्गपूरक जीवनशैली अंगीकारणे आदी अनेक प्रयत्नांतूनच जागतिक आणि स्थानिक पातळीवरील हवामान बदल रोखला जाऊ शकतो.

- प्रा. सुरेश चोपणे, (अध्यक्ष -ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सदस्य- क्षेत्रीय सशस्त समिती, केंद्रीय पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालय, दिल्ली)

मराठवाड्यामध्ये पावसात होणारी वाढ (टक्के)

शहर..............सरासरी......................खरीप हंगाम...............रब्बी हंगाम

औरंगाबाद......११ ते १८ .......................१७ ते १३..............११ ते २९

बीड.............११ ते २१.........................१७ ते २३............१२ ते २१

हिंगोली........१२ ते १८.........................१९ ते २२................१० ते १३

जालना.........८ ते १४.........................१० ते १५................१० ते १३

लातूर..........११ ते १७........................१२ ते १८...............७ ते १४

नांदेड...........१३ ते १९.......................६ ते २४................११ ते १८

उस्मानाबाद....९ ते १८.......................८ ते १९.....................१८ ते ३२

परभणी...........१३ ते २१....................६ ते १६...................१२ ते २५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com