Jayakwadi Dam : जायकवाडीत तीन दिवसांत पाच टक्के जलसाठा वाढला
Godavari River : नाशिक विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात जोरदार पाण्याची आवक झाली आहे. गेल्या तीन दिवसांत धरणाचा उपयुक्त साठा तब्बल ५ टक्क्यांनी वाढला आहे.
छत्रपती संभाजीनगर : नाशिक भागात पाऊस सुरू असल्याने गोदावरीच्या वरच्या खोऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाण्याची आवक सुरू झाल्याने तीन दिवसांत धरणात उपयुक्त पाणीसाठा पाच टक्क्यांहून अधिक वाढला आहे.