
जायकवाडी : येथील जायकवाडी (नाथसागर) धरण ९०.१३ टक्के क्षमतेने भरले. प्रकल्पातील आवक पाहता गुरुवारी (ता. ३१) ३ ते ३.३० दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग होणार आहे. धरणाचे एकूण अठरा दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात येतील.