Bypass Surgery Treatment : गुड न्यूज... आता घाटीत बायपास; पुढील आठवड्यापासून शस्त्रक्रियांना सुरवात, खर्च टळणार
Healthcare : घाटी रुग्णालयात आता बायपास शस्त्रक्रियांचा प्रारंभ होणार आहे, ज्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा खर्च टाळता येईल. पुढील आठवड्यापासून शस्त्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.
घाटी परिसर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सुपर स्पेशालिटीची वेगळी इमारत आहे. परंतु, रुग्णांसाठी आवश्यक असणारी बायपास शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा सहारा घ्यावा लागत होता.