

Chhatrapati Sambhajinagar
esakal
गोपाळपूर: शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले गोपाळपूर गाव. गाव अलीकडे बरंच सुधारले, जुन्या मातीच्या वाड्यांच्या जागी आता बंगले आणि सिमेंटची घरे उभी राहिली. गावात ड्रेनेजलाइन आली, सेप्टिक टँकही बांधले. सिमेंट रस्त्यांची काही कामे झाली. मात्र, आज गावाच्या वेशीवरचा रस्ता उखडलेला आहे, त्यात जागोजागी मोठाले खड्डेही पडलेत. काही अंतर्गत रस्ते अजूनही कच्चे असून, काही ठिकाणी अलीकडे केलेले सिमेंटचे रस्तेही उखडू लागलेत. विशेष म्हणजे, महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प जवळ असतानाही या गावात कचऱ्याचा प्रश्न कायम आहे.