Farmers Innovation : मुलाने तयार केले हरभरा खुडणी यंत्र; जवखेडा ठोंबरी येथील आठवीच्या गोरख ठोंबरेचा प्रयोग
Waste To Wealth : भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरी येथील इयत्ता आठवीतील गोरख संजय ठोंबरे याने अवघ्या शंभर रुपयांत टाकाऊ वस्तूंचा वापर करून हरभरा खुडणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राद्वारे त्याने दहा ते पंधरा एकर हरभऱ्याची खुडणी केली आहे.
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरी येथील इयत्ता आठवीतील गोरख संजय ठोंबरे या मुलाने टाकाऊ वस्तूंपासून हरभरा खुडणी यंत्र तयार केले आहे. अवघ्या शंभर रुपयांत तयार केलेल्या यंत्राद्वारे त्याने दहा ते पंधरा एकर हरभऱ्याची खुडणी केली आहे.