Pachod News : सरपंचपतीने विकला शासकीय भूखंड; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मुरमा (ता. पैठण) येथे चक्क सरपंच पतीने शासकीय भूखंड विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Notary
Notarysakal

पाचोड - मुरमा (ता. पैठण) येथे चक्क सरपंच पतीने शासकीय भूखंड विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून आता याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुरमा (ता.पैठण) येथील सात सदस्यीय ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होऊन सरपंचपदी प्रवर्गातून सिंधूबाई दादासाहेब शिंदे यांची वर्णी लागली.

त्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपतीने गावातील शासकीय ५० बाय ५० जागेवर अतिक्रमण करून मिळकत क्रमांक २४९ आपले नावे भोगवटादार म्हणून नोंद करून घेतली व त्यावर घर बांधून राहत आहे. सरपंचपदी सिंधूबाई शिंदे विराजमान होताच ग्राम पंचायत सदस्य गोपीचंद आहेर यांनी जिल्हाधिकार्याकडे याबाबत तक्रार दाखल केली.

त्यात नमुद केले की, सरपंचाच्या पतीने चक्क जागा सिद्धेश्वर मोहनराव गोरे रा.देवडी हदगाव (ता.घनसांवगी) यास दोन लाख रुपयांस विक्री केली. एवढेच नव्हे तर स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत दोन वर्षात सरपंच पतीने शौचालयाचे दोनवेळा प्रत्येकी बारा हजार रुपयांचे अनुदानही लाटले.

गावच्या प्रथम नागरिकाने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याची विक्री करणे म्हणजे ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याची विक्री करणाऱ्या सरपंचास पदावरून पायउतार करण्याची कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे गोपीचंद आहेर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.

काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंचपतीने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याची आम्ही तक्रार दिली. त्यानंतर महिला सरपंच पतीने ही जागा जवळच्या नातेवाईकास दोन लाख रुपयांस विक्री केली. तातडीने यासंबंधी संबंधितावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी.

- गोपीचंद आहेर, (ग्रामपंचायत सदस्य 'तथा' तक्रारकर्ता मुरमा)

गावठाण हद्दीतील शासकीय जमीन भोगवटा म्हणून एखाद्याला देण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार असून त्यानुसार ही जागा देण्यात आली होती. सदर जागेची मालकी हक्कात महाराष्ट्र शासन म्हणून ग्रामपंचायतीची तर भोगवटा म्हणून सरपंचपतीचे नाव आहे. ही जागा त्यांना विक्री करता येत नाही.

- हेमा आचले (ग्रामसेविका, मुरमा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com