पदवीधरांचा युती सरकारला दाखविला हिसका

पदवीधरांचा युती सरकारला दाखविला हिसका
Published on: 
दोन कॉलम -------- पदवीधरांचा युती सरकारला हिसका ः डॉ. हत्तीअंबिरे छत्रपती संभाजीनगर ः पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात पदवीधरांनी महायुतीला चांगलाच हिसका दाखविला. तरुणांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भीमराव हत्तीअंबिरे यांनी केली. हा निकाल म्हणजे पदवीधरांच्या नाराजीचे मतपेटीतून दिलेल्या उत्तराचे प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केले. केंद्र आणि राज्यात दशकभरापेक्षा दीर्घकाळ सत्ता असूनही भाजपला पदवीधरांचा विश्वास संपादन करता आलेला नाही. वेळेवर नोकरभरती होत नाही, वेळेवर परीक्षा होत नाहीत, परीक्षा झाल्यानंतर पेपरफुटीच्या घटना समोर येतात आणि निकाल जाहीर झाल्यानंतरही उमेदवारांना वेळेवर पदस्थापना मिळत नाही. या कारभारामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पदवीधर तरुणांमध्ये असंतोष वाढला होता. त्याचा हिसका महायुतीला पदवीधर निवडणुकीत तरुणांनी दाखवला. बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय आणि आर्टी या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे प्रशिक्षण, आर्थिक लाभ आणि शैक्षणिक संधी याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या युतीला तरुण मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.