Aurangabad ग्रामीण बँकेतर्फे घाणेगाव येथे जनजागरण मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

मुख्य व्यवस्थापक शन्मुख वानखेडे यांनी मार्गदर्शन केले

Aurangabad : ग्रामीण बँकेतर्फे घाणेगाव येथे जनजागरण मोहीम

वाळूजमहानगर : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा वाळूजतर्फे घाणेगाव येथे आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरणाची मोहिमेअंतर्गत जनजागरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी शाखा व्यवस्थापक नितीन टेकाडे यांनी या अंतर्गत येणाऱ्या विविध आर्थिक व वित्तीय समावेशनाच्या योजनांचा सविस्तरपणे माहिती दिली.

असंघटित तसेच आर्थिक दृष्टीने कमकुवत वर्गासाठी असलेल्या पंतप्रधान जीवन ज्योती, पंतप्रधान जीवन सुरक्षा, अटल पेंशन योजना, रूपे डेबिट कार्ड, आरोग्य विमा अंतर्गत येणाऱ्या विमा संरक्षणाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मुख्य कार्यालयातील मुख्य व्यवस्थापक शन्मुख वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.

बचत खात्यास आधार व मोबाईल लिंक करून केंद्र सरकारची संपूर्ण आर्थिक व वित्तीय समावेशनाच्या मोहीमेत सहभाग नोंदवून ही मोहीम यशस्वी करण्याचे आवाहनही केले. यावेळी बायोमेट्रिक मशिनद्वारे अनेक शेतकऱ्यांचे तत्काळ फ्री बचत खाते उघडण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच केशव गायके, उपसरपंच सुधाकर गायके, शाम फाळके पाटील, सोसायटी चेअरमन रामभाऊ गोरे, संजय राऊत, बँक मित्र धनंजय कुळकर्णी आदींची उपस्थिती होती.