लॉकडाऊनने हिरावला ‘पेरू’च्या उत्पन्नाचा गोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदेर (ता. उमरगा) : पेरूची बाग.

लागवडीसाठी रायपूर (छत्तीसगड) येथून एका जातीचे वाण असलेले पेरूचे प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे साडेअकराशे रोपांसाठी दोन लाख वीस हजार रुपये खर्च त्यांना आला. रोपासह खड्डे मारणे, लागवड, ठिबक असा साडेतीन लाखांचा खर्च प्रारंभी आला.

लॉकडाऊनने हिरावला ‘पेरू’च्या उत्पन्नाचा गोडवा

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पारंपारिक पीक (Traditional Crops Pattern) पद्धतीतून मिळणारे उत्पन्न कमी होत चालले आहे. काही उत्साही शेतकरी (Farmer) धाडस करून ओलिताखालील शेतीतून शेतीचे नव- नवीन प्रयोग करताहेत. तालुक्यातील (Umarga) कदेर येथील शेतकरी विवेकानंद स्वामी यांनी अडीच एकर क्षेत्रात पेरूची (Guava Cultivation) लागवड केली आहे. पहिला बहर चांगला बसला. परंतु, प्रत्यक्षात उत्पन्नही सुरू झाले मात्र लॉकडाउनच्या स्थितीमुळे बाहेरची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने कमी दरात पेरूची विक्री होत आहे. तालुक्यात कोरडवाहू शेतीचे (Dry Farm) क्षेत्र अधिक आहे. निसर्गावरच शेतीतील उत्पन्न अवलंबून असते. गेल्या पाच- सहा वर्षांपासून अवेळी पावसामुळे उत्पन्नात मोठी घट होत आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतात अनेक शेतकरी फळबाग, पालेभाज्या घेण्याचा प्रयोग करताहेत. कदेरच येथील शेतकरी श्री. स्वामी यांनी अडीच एकर क्षेत्रात पेरूची बाग करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: विनाकारण फिराल, तर आता सक्तीने कोरोना चाचणी

श्री. स्वामी यांनी तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्याशी संपर्क करून पांडुरंगराव फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेतला. या योजनेतून आत्तापर्यंत दीड लाखांचे अनुदान त्यांना मिळाले आहे. लागवडीसाठी रायपूर (छत्तीसगड) येथून एका जातीचे वाण असलेले पेरूचे प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे साडेअकराशे रोपांसाठी दोन लाख वीस हजार रुपये खर्च त्यांना आला. रोपासह खड्डे मारणे, लागवड, ठिबक असा साडेतीन लाखांचा खर्च प्रारंभी आला. या पेरूची लागवड २१ नोव्हेंबर २०१९ ला करण्यात आली. साधारणतः १७ महिन्यानंतर पेरूचा बहर आला. बुधवारी तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव व कृषी सहायक श्री. घुगरे यांनी बागेची पाहणी केली. चांगल्या पद्धतीने बाग आल्याचे पाहून त्यांनी श्री. स्वामी यांचे कौतुक केले. पहिल्या बहरात एका पेरूचे वजन साधारणतः आठशे ते तेराशे ग्रॅम आहे. ७० ते ८० क्विंटल उत्पन्न अपेक्षित आहे, त्यातील पंचवीस क्विंटल पेरूची विक्री झाली. परंतु, बाहेर जिल्ह्यातील बाजारपेठ लॉकडाउनमुळे बंद असल्याने किमान साठ ते सत्तर रुपये किलो मिळणारा दर सतरा ते तीस रुपयांवर आला. त्यामुळे मिळणारा फायदा घटला आहे.

पेरूच्या बागेचे उत्पन्न साधारणतः २० वर्षांपर्यंत घेता येते. पहिल्यांदा लागवडीचा खर्च मोठा असतो. त्यानंतर फोम, कॅरिबॅग व पेपर लावण्यासाठी खर्च येतो. पहिला पेरूचा बहर चांगला आला. मात्र, लॉकडाउनने तो हिरावून घेतला. पुणे, हैदराबादची बाजारपेठ बंद आहे. सोलापूरला माल पाठवला. यात दर कमी मिळाला. आता तेही बाजारपेठ उपलब्ध होत नाही. सध्या पिकलेले वजनदार पेरू खाली पडताहेत. लॉकडाउनची स्थिती नसती तर तीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असते.

- विवेकानंद स्वामी, शेतकरी, कदेर

loading image
go to top