विनाकारण फिराल, तर आता सक्तीने कोरोना चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर कोरोना कसा हरणार? परिचारिकेचा व्यथित सवाल

कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे चित्र असल्याने नागरिकांची रस्त्यावरील गर्दी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासकांनी नागरिकांनी विनाकारण फिरणे बंद करावे.

विनाकारण फिराल, तर आता सक्तीने कोरोना चाचणी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्ग (Corona Infection) कमी व्हावा यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. आवश्‍यक काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आदेश आहेत. पण या आदेशाचे पालन न करता अनेक जण शहरात बिनधास्त फिरत आहेत. अशा नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी दहा पथकांची वाढ करण्यात आली आहे. आता सक्तीने चाचणी केली जाणार आहे. महापालिकेचे (Aurangabad Municipal Corporation) प्रशासक आस्तिकुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी यासंदर्भात टिट्व केले आहे. त्यात नागरिकांना दक्ष राहवे, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोरोना संसर्गामुळे ३१ मेपर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे पुढील दहा दिवस रुग्णसंख्या कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. घरीच थांबून कोरोना संसर्ग कमी करण्यास मदत करावी, असे आवाहन करताना त्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची आता सक्तीने कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी दहा पथके वाढवली जात आहेत असे त्यांनी नमूद केले आहे. सध्या शहरात (Aurangabad) विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी केली जात आहे. पण सहाच पथके आहेत. (If Anyone Come Out Home Without Reasons Then Compulsory Corona Test In Aurangabad)

हेही वाचा: आईला मारहाण केल्याने राग अनावर, मुलाने वडिलांवर झाडल्या गोळ्या

स्वयंशिस्त पाळा; मुलांची काळजी घ्या

कोरोना संसर्ग कमी होत असल्याचे चित्र असल्याने नागरिकांची रस्त्यावरील गर्दी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासकांनी नागरिकांनी विनाकारण फिरणे बंद करावे. तरच कोरोना संसर्ग नियंत्रणात येईल. सध्या शहरातील रुग्ण संख्या कमी होत आहे पण कोरोना संपलेला नाही. कोरोनाला हरवायचे असेल तर स्वयंशिस्त पाळावीच लागेल. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांनी शिस्त पाळत लहान मुलांची काळजी घ्यावी, असेही श्री. पांडेय यांनी नमूद केले आहे.

महापालिकेचे फिरते पथक

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी शहरात महापालिकेचे स्वतंत्र फिरते पथके तैनात करण्यात आले आहे. विना मास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकावर कडक कारवाई करण्याचे आदेश पथकाला देण्यात आले असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

शेवटचे दहा दिवस कडक अंमलबजावणी

लॉकडाऊनचे शेवटचे दहा दिवस शहरात नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याशी चर्चा झाली असून, यासंदर्भात शुक्रवारी आदेश काढण्यात येतील. विनाकरण घराबाहेर पडणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी तर केलीच जाईल सोबत, दंडही लावला जाणार आहे.

loading image
go to top