

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत २५० हून आधी फ्लॅट-घरांचे बुकिंग झाले. तर, साधारण तितक्याच नव्या घरांत कुटुंबांनी गृहप्रवेश केला. यंदा वन बीएचके आणि २ बीएचके या परवडणाऱ्या श्रेणीतील घरांना अधिक मागणी दिसून आली. तीन हजार दुचाकी, ६५० कारची तडाखेबाज विक्री करीत वाहन बाजाराने ८० कोटींची उलाढाल नोंदवली.
क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पाटारे यांनी सांगितले, की १५ लाख रुपयांच्या आसपास १ बीएचके आणि ३० ते ७० लाखांमध्ये २ बीएचके फ्लॅट्स घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. यंदा डीएमआयसीमुळे पैठण रोडवर बिडकीनपर्यंत, बीड बायपास, शेंद्रा या भागांतील मालमत्तांना सर्वाधिक मागणी होती.