''गुजर गल्लीच्या राजाच्या'' मंडपात

''गुजर गल्लीच्या राजाच्या'' मंडपात
Published on
गुजर गल्लीचा ‘राजा’ साडेतीन शक्तिपीठांच्या रूपात श्री त्रिमूर्ती गणेश मंडळाचा ४६ वा गणेशोत्सव; देखावा, विद्युत रोषणाई ठरणार आकर्षण ----- धाराशिव, ता. १७ : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा अग्रदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजर गल्लीतील ‘श्री त्रिमूर्ती गणेश मंडळाने’ ४६ व्या वर्षांत दिमाखात पदार्पण केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांसाठी ‘साडेतीन शक्तिपीठांचा’ भव्य, नयनरम्य देखावा आणि आकर्षक विद्युत रोषणाई हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. मंडळाने उभारलेला साडेतीन शक्तिपीठांचा देखावा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. देखाव्यात देवींचे भव्य, मंगलमय व हुबेहूब रूप साकारले आहे. एकाच मंडपात चारही आदिशक्तींच्या दिव्य दर्शनाचा अनुभव भाविकांना घेता यावा, अशा पद्धतीने देखाव्याची रचना करण्यात आली आहे. सूक्ष्म कलाकुसर, चित्ताकर्षक रंगसंगती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विद्युत रोषणाईमुळे मंडप परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला आहे. ----- १९८१ पासून सामाजिक बांधिलकी १९८१ मध्ये अवघ्या पाच ते सहा सदस्यांनी सुरू केलेल्या या मंडळाचा प्रवास आज मोठ्या ‘त्रिमूर्ती परिवारात’ झाला आहे. गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता मंडळाकडून वर्षभर विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. दरवर्षी आरोग्य व रक्तदान शिबिरे, जिल्हा रुग्णालयात फळवाटप, महिला दिनानिमित्त नवजात बालकांसाठी ‘बेबी किट’ वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम तसेच शासकीय योजना व शेतीविषयक मार्गदर्शन असे उपक्रम राबविले जातात. मंडळाच्या प्रवासात बाळकृष्ण झाडे, संतोष जहागीरदार, गोपाळ म्हेत्रे, प्रशांत बेद्रे, निशिकांत भोज यांच्यासह ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नगरसेवक प्रदीप मुंडे व नगरसेवक पंकज पाटील यांचेही मंडळाला सहकार्य मिळत आहे. जनसंपर्काची धुरा संजय जहागीरदार व अजित माळी सांभाळत आहेत. यंदा मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांच्या उत्साहातून ‘गुजर गल्लीचा राजा’चा गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. ----- OSM26B07025 धाराशिव : गुजर गल्लीतील श्री त्रिमूर्ती गणेश मंडळाने साकारलेला साडेतीन शक्तिपीठांचा भव्य नयनरम्य देखावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com