

Illegal Plotting in Harsul
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहर परिसरात सुरू असलेल्या बेकायदा प्लॉटिंगवर महापालिकेतर्फे जेसीबी फिरविण्याची कारवाई सुरूच असून, शनिवारी (ता. २६) हर्सूल परिसरातील गट नंबर २३४ व गट नंबर २४७, २४९ मध्ये सुमारे २८ एकरवरील ९४० प्लॉट निष्कासित करण्यात आले. याठिकाणी चक्क आमदार निधीतून रस्ते तयार करून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. बेकायदा प्लॉटिंगसाठी मुखत्यारनामा लिहून देणाऱ्या जब्बार खाँ महेबूब खाँ पठाण व गौसखाँ मेहमूद खाँ मेवाती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.