Hawkers Zone : महापालिका म्हणते, नये साल में, कुछ नया हो जाए! शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न लागणार मार्गी
Chh. Sambhajinagar Municipal Corporation : शहरातील प्रलंबित हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका हॉकर्स संघटनांची निवडणूक घेणार आहे. यामुळे शहरातील १४,००० अधिकृत पथविक्रेत्यांचे झोन निश्चित होतील.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. परंतु, आता झोन निश्चित करण्यासाठी येत्या महिन्यात हॉकर्स झोनची निवडणूक होणार आहे. शहरात १४ हजार ९८ अधिकृत पथविक्रेते आहेत.