esakal | कधी थांबणार? माहेरहून 5 लाख आणले नाहीत म्हणून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

बोलून बातमी शोधा

Crime
कधी थांबणार? माहेरहून 5 लाख आणले नाहीत म्हणून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न
sakal_logo
By
सुषेन जाधव-सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पायाच्या उपचारासाठी माहेराहून ५ लाख रुपये का आणले नाहीत असे म्हणत, पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना १८ एप्रिल रोजी हर्सूल परिसरातील ऑडीटर सोसायटी येथे घडली. प्रकरणात हर्सुल पोलिसांनी आरोपी पतीला मंगळवारी (ता.२०) रात्री अटक केली. दिनेश डिगंबर परदेशी (३६) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती दिनेश परदेशी (रा. ऑडीटर सोसायटी, प्लॉट नं ५७, हर्सूल) याने पत्नीला तु तुझ्या वडीलांकडून माझ्या पायाच्या उपचारासाठी पाच लाख रुपये का आणले नाही? अशी विचारणा केली. यानंतर पत्नीच्या अंगावर पेट्रोल फेकून तिला पेटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पिडितेने ओरडत बाथरुम गाठले व नळ सुरु करुन अंगावर पाणी ओतले.

हेही वाचा: मराठवाड्यात १५८ जणांचा मृत्यू; दिवसभरात वाढले सात हजार ४६८ कोरोनाबाधित

त्यानंतर पीडितेचा दीर महेश याने महिलेला उपचारासाठी घाटीत दाखल केले. प्रकरणात हर्सूल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीला अटक करुन बुधवारी (ता.२१) न्यायालयात हजर केले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (ता.२३) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी बुधवारी (ता.२१) दिले.