

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यात सिल्लोड, सोयगाव, पैठण, वैजापूर आणि फुलंब्रीसह विविध तालुक्यांत दोन-तीन दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या पेरणीपूर्व मशागती आणि प्रत्यक्ष पेरणीला वेग आला असून, कृषी सेवा केंद्रांवर बी-बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. एकीकडे पावसाने शेतकरी सुखावला असला तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, पूल वाहून जाणे आणि रस्त्यांवर पाणी साचणे अशा घटनांमुळे नागरिकांची मोठी गैरसोयही झाली आहे.