
Heavy Rain
esakal
महेश रोडे
निल्लोड (ता. सिल्लोड) : निल्लोड मंडळात रात्री तब्बल ११५ मिमी पाऊस झाल्याने परिसरातील पिकांचे तसेच सिंचन तलावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. निल्लोड येथील पाझर तलाव क्रमांक ०१ मधील धरणाच्या भिंतींमधून गळती सुरू असून पाळूच्या पायथ्याशी सहा ते सात ठिकाणी पाण्याचा वेगाने विसर्ग होत आहे. सतत सुरू असलेल्या गळतीमुळे तलाव फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.