
Heavy Rain
sakal
फुलंब्री : येथील महात्मा फुले मागासवर्गीय मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. धरणात संचयित केलेले परिपक्व मासे मुसळधार पावसामुळे गिरिजा नदीत वाहून गेले. यात संस्थेचे तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.