Crop Damage: फुलंब्री तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मका, कपाशी व तूर पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Cotton Loss: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका गावात ढगफुटीसदृश पावसामुळे मका, कपाशी आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल विभागाने पीक पाहणी करून नुकसानाची नोंद घेतली.
फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका येथे शुक्रवारी (ता. १५) ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसामुळे मका, कपाशी, तूर पिकासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकाची महसूल विभागाने शनिवारी पाहणी केली.