
छत्रपती संभाजीनगर : दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (ता. २७) रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले. यामुळे अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या, तर अनेक रेल्वे मार्ग बदलून धावल्या. त्याचप्रमाणे काही रेल्वेगाड्या उशिराने धावल्या.