esakal | औरंगाबाद शहराला मुसळधार पावसाने झोडपले; सुखना, खाम नदीला पूर | Aurangabad Rain Updates
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - सुखना नदी ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर आला आहे.

औरंगाबाद शहराला मुसळधार पावसाने झोडपले; सुखना, खाम नदीला पूर

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरात शनिवारी (ता.दोन) पहाटे पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला. शहरातून (Aurangabad) वाहणाऱ्या खाम (Kham River), सुखना नदीला (Sukhana River) मोठा पूर आला असून, नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलठाणा, चौधरी कॉलनी, नूर कॉलनी या भागाला पूराचा मोठा फटका बसला. सुमारे तीनशे ते चारशे घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली. शहराला गुलाब चक्रीवादळाने (Gulab Cyclone) २८ सप्टेंबरला जोरदार तडाखा दिला होता. त्यानंतर आलेल्या शाहीन चक्रीवादळामुळे शनिवारी पहाटेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पहाटे ३.२५ वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. यानंतर ३.३८ वाजे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पहाटे ३.३८ ते ४.०३ या पंचवीस मिनिटांत विजांचा कडकडाट, ढगांच्या (Rain In Aurangabad) गडगडाटासह सरासरी ११८ मिलिमिटर मिटर प्रतितास या ढगफुटीच्या वेगाने पाऊस पडला. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या खाम, सुखना नद्यांना पूर आला.

हेही वाचा: अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणाचे पुन्हा दरवाजे उघडले,पाणीपातळीत वाढ

नागरिक पहाटेच्या साखर झोपत असताना त्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अग्निशमन विभागाला मदतीसाठी फोन करण्यात आले. पण तोपर्यंत अनेकांच्या घरात कंबरेपर्यंत पाणी साचले होते. नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलाठाणा, चौधरी कॉलनी, नूर कॉलनी या भागातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली. त्यामुळे जीवित हाणी झाली नाही. दरम्यान सकाळी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे नऊ वाजेच्या सुमारास दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली. दरम्यान शहरातील अनेक व्यापाऱ्यांना पावसाचा फटका बसला. तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले.

७८.२ मिलिमिटर पावसाची नोंद

शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पहाटे पंचवीस मिनिटाच्या पावसाची ५१.२ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. तसेच पहाटेपर्यंतच्या एकूण पावसाची ७८.२ मिलिमिटर एवढी पावसाची नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत रात्री ११.३० ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंच्या पावसाची नोंद ४४.०५ मिलिमिटर एवढी झाली आहे.

हेही वाचा: Solapur : धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नियोजन सुरू

तिसऱ्यांदा ढगफुटी सदृष्य पाऊस

यंदा प्रथमच औरंगाबाद शहरावर गेल्या एका महिन्यात तीन वेळेस ढगफुटीच्या वेगाने पावसाने हजेरी लावली आहे, असे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी कळविले आहे.

पुरात मारली उडी

चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाठीमागे एकाने सुखनानदीपात्रात उडी मारल्याचा प्रकार घडला. त्याला वाचविण्यात नागरिकांना यश आले.

loading image
go to top