कन्नड, वैजापूर, खुलताबाद तालुक्यातील काही भागांना पावसाचा तडाखा

लोणी खुर्द (ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) : पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी.
लोणी खुर्द (ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) : पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी.
Summary

बऱ्याच ठिकाणी शेतातील झाडे पडली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पहिल्याच पावसाने मोठा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.

चापानेर/महालगाव/टाकळी राजेराय (जि.औरंगाबाद) : चापानेर (ता.कन्नड) (Kannad) परिसरात सोमवारी (ता.३१) सायंकाळी ६ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने (Rain Damage Crops) पिकांचे मोठे नुकसान झाले. गावातील घरे तसेच शाळांवरील पत्रे उडाल्याची घटना घडल्या. तर बऱ्याच ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याचे निदर्शनास आले. चापानेर परिसरात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळात येथील खोलेश्वर आश्रम तसेच स्मशानभूमीवरील सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Aurangabad) तसेच स्मशानभूमीमध्ये लावलेली मोठी झाडेही उन्मळून पडली. गावातील हेमंत कापुरे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला. चापानेर येथील प्राथमिक शाळा या शाळे वरील ७० टक्के पत्रे उडाली. (Heavy Rain Hit Kannad, Vaijapur, Khultabad Blocks)

लोणी खुर्द (ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) : पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील मुख्य रस्त्यावर साचलेले पाणी.
औरंगाबाद अनलाॅकच्या दिशेने; दुपारी दोनपर्यंत दुकाने राहणार उघडी

जवळपास पूर्ण शाळा उघडी पडल्याचे चित्र आहे. यामुळे शाळेतील संगणक आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. गावालगतच असलेल्या आसाराम पवार यांच्या शेतातील दीड एकर केळीची बाग जोरदार वाऱ्याने उन्मळून पडली. यात लाखोंचे नुकसान झाले. परिसरात बऱ्याच ठिकाणी शेतातील झाडे पडली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पहिल्याच पावसाने मोठा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. या पावसामुळे काही ठिकाणी कांदे, उन्हाळी मका, बाजरी ओली दिसून आले. येथील नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महालगाव परिसरात दमदार हजेरी

महालगाव (ता.वैजापूर) (Vaijapur) परिसरात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता पावसाने वादळी वाऱ्यासह एक तास दमदार हजेरी लावली. जोरदार झालेल्या पावसामुळे परिसरातील कांदा व अन्य पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. परंतु पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने मशागत करून पेरणीच्या व लागवडीसाठी तयार असलेला शेतकरी सुखावला आहे. यामुळे नांगरणी केलेल्या शेतामध्ये पाणीच पाणी साचले होते. येथील छोटे-मोठे ओढे खळखळून वाहिले.

टाकळी राजेराय परिसरात बरसला

टाकळी राजेरायसह (ता.खुलताबाद) (Khultabad) परिसरात सोमवारी (ता.३१) मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील टाकळीसह ममनापूर, भगतवाडी, गोळेगाव, घोडेगाव, विरमगाव आदी परिसरात सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही भागातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्या एक दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडत असून यंदाही सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com