esakal | अवकाळी पावसाचा तडाखा! शाळेची पत्रे वार्‍याने कागदासारखी उडाली
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

अवकाळी पावसाचा तडाखा! शाळेची पत्रे वार्‍याने कागदासारखी उडाली

sakal_logo
By
संतोष शेळके

करमाड (औरंगाबाद): जिल्हा परिषद कुंभेफळ (ता. औरंगाबाद) शाळेच्या दोन खोल्याचे पत्रे रविवारी (ता.दोन) रात्री अवकाळी पावसासोबतच्या वादळी वार्‍याने उडाली. सध्यस्थितीत बंद असलेली शाळा व रात्रीच्या वेळेमुळे कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

कुंभेफळ (जिल्हा औरंगाबाद) येथील या जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेची इमारत 1949 मध्ये बांधलेली असली तरी ती अजूनही सुस्थितीत आहे. दरम्यान, या अवघ्या पंधरा मिनीटांच्या जोरदार वार्‍याने या सुस्थितीतील दोन खोल्यांचे पत्रे रात्री आठ वाजताच्या सुमारास अगदी कागदासारखी उडून दुरवर जाऊन पडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. यावेळी सोबतच दोन बाजूच्या भिंतीही पत्त्यासारख्या कोसळल्या, तर लगतच्या भितींनाही मोठे तडे गेले.

हेही वाचा: प्रेम संबंधात अडथळा निर्माण करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

सोमवारी (ता.तीन) सकाळीच उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, शालेय समिती अध्यक्ष बद्रिनाथ मुळे, मुख्याध्यापक हाशम शहा यांनी नुकसानीची पाहणी करून उडालेल्या पत्रांची व इतर साहित्याची शोधाशोध केली. यात दोन खोल्या पडल्यामुळे शाळा साहित्यासह संगणक व वाचनालय साहित्याचे देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष शेजवळ, वसंतराव घाळ , ज्ञानेश्वर गोजे , राजूभाऊ जवणे, सपनाताई डाखुरकर, सहशिक्षक कैलास ताठे आदींसह गावांतील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

loading image