esakal | प्रेम संबंधात अडथळा निर्माण करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

प्रेम संबंधात अडथळा निर्माण करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

sakal_logo
By
वैजिनाथ जाधव

गेवराई (बीड): राजापूर शिवारात सापडलेल्या पस्तीस वर्षीय ज्ञानेश्वर चव्हाणचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोनच दिवसात जलद गतीने सुत्रे फिरवत खून करणारे दोन आरोपी ताब्यात घेतले असून प्रेम संबंधात अडथळा निर्माण होत असल्याने मयताच्या पहिल्या पत्नीने व प्रियकराने खून केला उघड झाले आहे.

तालुक्यातील राजापूर शिवारात शनिवार (१ मे) रोजी ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय 35) (रा.गोळेगाव) यांचा मृतदेह नाकातून रक्त येत असलेल्या व गळ्यावर मारल्याचे निशाण असलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला होता. तलवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: Mental health: 'अति विचार टाळून नॉर्मल रहा'

या प्रकरणाची तलवाडा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान तलवाडा पोलिसांना खूनाचा संशय आल्याने त्यांनी जलद गतीने तपासाची सूत्रे फिरवून व गोपनीय माहितीदारांकडून माहिती घेतली. त्यात ज्ञानेश्वर चव्हाण यांना गोसावी वस्तीवरील नाना आप्पा शिंदे व मयताची पहिली पत्नी छाया ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांच्यात असलेल्या प्रेम संबंधात अडथळा निर्माण होत असल्याने कट रचून ज्ञानेश्वरचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा: धक्कादायक! आईने स्वतःच्या मुलांनाच फेकले घरावरून; चिमुरड्याचा मृत्यू

ज्ञानेश्वर चव्हाण यास नाना शिंदे यांनी बोलवून दारू पाजून राजापूर शिवारात रघुनाथ खेडकर यांच्या शेतात दोरीने गळा आवळून खून केला असल्याचे आरोपीने कबूल केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदरील कामगिरी तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे, पोलीस नाईक खाडे यांनी केली.

loading image