औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, खाम नदीला पूर/Aurangabad Rain News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या खाम नदीला पूर आला आहे.

Aurangabad : औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा जास्त पाऊस, खाम नदीला पूर

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Cyclone) सोमवारी (ता.२७) व आज मंगळवारी (ता.२८) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या चक्रीवादळामुळे आज मंगळवारी औरंगाबाद (Aurangabad) शहरात पहाटे १२:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले. त्यावेळेस एमजीएम जेएनईसी वेधशाळेत (Rain In Aurangabad) पावसाचा वेग ११०.७ मीमी प्रतितास मोजला गेला. या नंतर सकाळी १०:५१ ते ११:२१ या अर्ध्या तासाच्या कालावधीत ढगफूटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. या तीस मिनिटांच्या काळात पाऊस पड़ण्याचा  सरासरी  वेग हा १०८.० मीमी प्रतितास एवढा नोंदला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत ५२.२ मीमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच औरंगाबाद शहरावर पुन्हा ढगफुटीपेक्षा  वेगाच्या पावसाने झोडपून काढले.(ताशी शंभर मीमी किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हटली जाते)

हेही वाचा: Aurangabad Rain : औरंगाबादेत मुसळधार पाऊस,अनेक भागात पाणी

पहाटे १२:१० ते सकाळी ११:१५ या सुमारे अकरा तासात औरंगाबाद शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत ९८.३ तर एमजीएम गांधेली वेधशाळेत ७४.९ मीमी पावसाची नोंद झाली, असल्याची माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लबचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

अपडेट्स

- खामनदीला पूर आला आहे.

- अनेक ठिकाणी झाडे कोसळली

- ठिकठिकाणी पाणी साचले

हेही वाचा: Nanded Rain : नांदेडसह जिल्हा झाला जलमय,रात्रीपासून जोरदार पाऊस

loading image
go to top