Jayakwadi Dam
sakal
छत्रपती संभाजीनगर
Jayakwadi Dam: नाथसागरातून विसर्गात वाढ; गोदावरी नदीपात्रात १.१३ लाख क्युसेक पाणी
Godavari River: जायकवाडी धरणात मुसळधार पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. प्रशासनाने तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडला असून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जायकवाडी (ता. पैठण) : नाथसागर धरण परिसरात रविवारी (ता. १४) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली. यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढवला.