

Marathwada Flood
sakal
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने सोमवारी (ता. २९) उसंत घेतली असली, तरी धरणांतून मोठा विसर्ग आणि नद्यांचा पूर कायम आहे. जायकवाडी धरणातून केलेल्या मोठ्या विसर्गामुळे बीड, जालना, परभणी जिल्ह्यांतील अनेक गावांतील सुमारे २५ हजार नागरिकांचे प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.