Video : औरंगाबाद तालुक्यासह चित्तेपिंपळगाव परिसरात जोरदार पाऊस


निपाणी  (ता.औरंगाबाद) : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या  पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात तुंबलेले पाणी. (छायाचित्र: दिनेश शिंदे) 
निपाणी (ता.औरंगाबाद) : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात तुंबलेले पाणी. (छायाचित्र: दिनेश शिंदे) सकाळ
Summary

जोरदार पाऊस झाल्याने वातावरणही थंड झाले आहे. त्यामुळे उकाड्यापासुन थंडावा मिळेल.

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद (Aurangabad) तालुक्यासह चित्तेपिंपळगाव परिसरात पावसाने (Rain) गुरूवारी (ता.२७) सायंकाळी पाचच्या सुमारास जवळपास अर्ध्या तासाच्या वर जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रातील पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जोरदार पाऊस झाल्याने वातावरणही थंड झाले आहे. त्यामुळे उकाड्यापासुन थंडावा मिळेल. परिसरातील  शेतकरीवर्गात (Farmer) रोहिणी नक्षत्रातील (Rohini Nakshatra) पहिलाच पाऊस जोरदार झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता खरिपाच्या मशागतीच्या (Agriculture) कामाला वेग येणार आहे. एकोड, पाचोड, लायगाव, आपतगाव, भालगाव, गारखेडा, चित्तेपिंपळगाव, निपाणी, आडगाव या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सध्यातरी शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. (Heavy Rainfall In Aurangabad Block With Chittepimplegaon)


निपाणी  (ता.औरंगाबाद) : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या  पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात तुंबलेले पाणी. (छायाचित्र: दिनेश शिंदे) 
मराठा आरक्षणावरुन चिखल फेक, हर्षवर्धन जाधव यांची टीका

यंदा पाऊस जरी जुन महिन्याच्या आगोदर लवकर पडला असला तरी शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची घाई करू नये. सात जून नंतर चांगला पाऊस पडल्या नंतरच पेरणीला सुरवात करावी.

हर्षदा जगताप, कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com