Aurangabad : खंदारे कुटुंबाला मदतीचा हात

शनिवारी सकाळी खंदारे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागली
Aurangabad
Aurangabadsakal
Summary

शनिवारी सकाळी खंदारे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागली

वाळूजमहानगर : घाणेगाव येथील खंदारे कुटुंबाच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण घर उध्वस्त झाले. त्यामुळे उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला वाळूज औद्योगिक वसाहतीतील समाजसेवकांनी पुढे येत ब्लॅंकेट, मुलांना ड्रेस, साड्या व मिठाई देऊन धीर दिला.

वाळूज औद्योगिक वसाहतीमधील निरंजन नामदेव खंदारे हे घाणेगाव येथील एकलव्यनगरात पत्नी व मुलासह पत्र्याच्या घरात राहतात. शनिवारी सकाळी खंदारे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागली. या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु खंदारे यांच्या घरामधील रोख २० हजार रुपयांसह सोन्याचांदीचे दागिने तसेच संसारोपयोगी साहित्य या आगीत जळून खाक झाले.

त्यामुळे खंदारे कुटुंब उघड्यावर पडले होत. त्यात थंडीचे दिवस. घटनेनंतर या पीडित कुटुंबाला तात्काळ मदतीचा हातभार म्हणून सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन, अमित व्यवहारे व वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज या कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्थापक व्यंकट मैलापुरे हे तात्काळ मदतीसाठी धावून आले व निरंजन नामदेव खंदारे यांच्या कुटुंबासाठी लागणारे कपडे, ब्लॅंकेट, साड्या, मुलीसाठी व मुलासाठी ड्रेस व घरात तात्काळ लागणारे साहित्य व मिठाई देऊन निरंजन खंदारे कुटुंबीयास दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com