High Court Clerk Exam: ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी; संतप्त उमेदवारांचा साडेबारा तास ठिय्या, न्यायालयाची लिपिक भरती

Technical Glitches Disrupt High Court Clerk Typing Test: छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीच्या ऑनलाइन टंकलेखन परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्या. की-बोर्ड, स्क्रीन, लॉग-आऊट आणि वेळेआधी सबमिशनच्या तक्रारींनंतर संतप्त उमेदवारांनी साडेबारा तास ठिय्या आंदोलन केले.
High Court Clerk Exam

High Court Clerk Exam

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक (क्लर्क) पदासाठी रविवारी (ता. १६) २० गुणांच्या टंकलेखन कौशल्य (टायपिंग स्किल) परीक्षेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे संतप्त उमेदवारांनी जालना रोडवरील सेव्हन हिल परिसरातील ‘बायटेझ इन्फोटेक’ या परीक्षा केंद्रात सकाळी ११ पासून ठिय्या आंदोलन केले. परीक्षा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांनी केली. दरम्यान, संबंधितांनी प्रकरणाची चौकशी करून पुढे काय करायचे ते कळवले जाईल, असे पत्र दिल्याने रात्री साडेअकराच्या सुमारास विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com