

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग (क्र. ७५३)च्या दयनीय अवस्थेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकार व संबंधित यंत्रणांना कडक शब्दांत फटकारले. रस्त्यांची तत्काळ व दर्जेदार दुरुस्ती न केल्यास अपघातांसाठी राज्याला जबाबदार धरून नुकसान भरपाई लावण्याचा इशारा न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी दिला आहे.