Hingoli Banana Farmer
esakal
लक्ष्मण सारंग यांनी साडेचार एकर केळीची लागवड केली.
मेहनत व खर्च असूनही बाजारभाव गडगडल्याने उत्पन्न धोक्यात आले.
केळी झाडांवर पिकत आहेत, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
हयातनगर (हिंगोली) : भारत हा कृषिप्रधान देश असून, शेतकरीवर्ग हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला भाव व त्यांच्या कष्टाचं मोल त्यांना योग्यरीत्या मिळत नसल्यामुळे आजही शेतकरी उपेक्षितच असल्याचे चित्र सर्वत्र आहे. असाच काहीसा प्रकार येथील केळी उत्पादक शेतकरी (Hingoli Banana Farmer) लक्ष्मण उत्तमराव सारंग या शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे. त्यांनी मोठ्या मेहनतीने व प्रचंड पैसा खर्च करून केळीचे पीक घेतले. मात्र, उत्पादन निघण्यास सुरवात होताच भाव गडगडले. त्यामुळे आता केलेला खर्चही निघतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.