
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारावर कारवाईचा धडका सुरू केला असून एक जणास एक वर्षासाठी स्थान बध्द केल्यानंतर पाच जणांना सहा महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावरील या कारवाईचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. हिंगोली जिल्ह्यात सण, उत्सवाच्या पार्श्भुमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे, यामध्ये अवैध व्यवसायावर छापे टाकण्यासाठी स्वतंत्र पोलिस पथके स्थापन 'करण्यात आली आहेत.