Hingoli Crime News : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारमध्ये 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून; परिसरात खळबळ

Hingoli Crime News : हिंगोलीच्या जवळाबाजार परिसरात २६ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे महत्त्वाचे धागेदोरे मिळवले असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
Police team inspecting a crime scene at Jawala Bazar Hingoli

Police team inspecting a crime scene at Jawala Bazar Hingoli

esakal

Updated on

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे एका 26 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी ता. 2 पहाटे सह वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना या घटनेतील महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून आरोपीच्या अटकेनंतरच खूनाचे नेमके कारण समोर येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com