Hingoli Flood News : हिंगोलीत पुरात अडकलेल्या आठ जणांची यशस्वी सुटका; पैनगंगेच्या वेढ्यात ३६ तास
Kalmanuri Flood : कळमनुरी तालुक्यात पैनगंगा नदीच्या पुरात शेत आखाड्यावर ३६ तास अडकून पडलेल्या आठ जणांची बोट व आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली.
कळमनुरी : पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गांगापूर परिसरात ३६ तासांपासून शेत आखाड्यावर अडकून पडलेल्या आठ जणांना महसूल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने मंगळवारी (ता. १९) दुपारी बाराच्या सुमारास सुखरूप बाहेर काढले. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.