Hingoli Ashram School Incident
esakal
येडशी तांडा आश्रमशाळेच्या वसतिगृहात अनुचित प्रकार घडला.
मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात आले.
अधीक्षकावर गुन्हा दाखल, पालक आणि ग्रामस्थांचा संताप.
हिंगोली : येडशी तांडा येथे भोजाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहामध्ये (Hingoli Ashram School Incident) तीन दिवसांपूर्वी अनुचित प्रकार घडला. त्या प्रकरणात वसतिगृहाकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी (ता. १५) रात्री उशिरा काढण्यात आले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात एका शिक्षकासह वसतिगृहाच्या अधीक्षकावर गुन्हाही दाखल झालेला आहे.