
मुकुंदवाडी : रात्रीचे साडेअकरा वाजलेले. ‘सकाळ’चा फोन खणखणला. ‘सोहम मोटर्स’च्या मागे असलेल्या चिंचेच्या झाडाजवळील सारा गार्डन अर्पाटमेंटच्या तळमजल्यात एक ज्येष्ठ व्यक्ती तीन दिवसांपासून बेवारस पडलेली आहे. तिला उठता-बसता येत नाही.’ काळजीच्या स्वरात समोरील व्यक्ती सांगत होती. तोच ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी घटनास्थळ गाठले. ‘बाबुजी, चार दिन से यहीं पडा हूं; मुझे ठीक करवा दो’ अशा आशेने त्या ज्येष्ठाने मदतीची याचना केली. शासकीय रुग्णवाहिकेच्या १०८ क्रमांकावर कॉल करत ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी त्यांना मध्यरात्री साडेबाराला घाटी रुग्णालयात पोचवले.