सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

जुलै-२०२२ या महिन्यासाठी सात पोलिस ठाणे, पोलिस अधिकारी यांचा गौरव करण्यात आला
Honoring the best performing officers Aurangabad
Honoring the best performing officers Aurangabad

औरंगाबाद - ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस ठाण्यांतून सात श्रेणीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्यांचा, अधिकाऱ्यांचा गौरवचिन्ह व प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव करण्याचा उपक्रम पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. बुधवारी (ता. २०) पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकीदरम्यान २३ ठाण्यांचे गुणाकंन पद्धतीने कामाची प्रतवारी करून उल्लेखनीय कामगिरीसाठी जुलै-२०२२ या महिन्यासाठी सात पोलिस ठाणे, पोलिस अधिकारी यांचा गौरव करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट गुन्हे निर्गतीमध्ये (कंसात गुन्ह्यांची संख्या) वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत (१२७), सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती (१२८), गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे, सीसीटीएन प्रणाली माहिती भरणे यात देवगाव (रं) सहायक निरीक्षक अमोल मोरे, सर्व अवैध धंद्याविरुद्ध कारवाईमध्ये निरीक्षक भुजंगराव हातमोडे (खुलताबाद ठाणे), सर्वाधिक बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणाऱ्या करमाड ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर खोकले, अंमलदार सुनील गोरे; तसेच सर्वाधिक दोषसिद्धीमध्ये पिशोर ठाण्याचे कोर्ट पैरवी सतीश देसाई व एमआयडीसी ठाण्याचे कोर्ट पैरवी सहायक फौजदार महेराज चॉंद शेख (प्रत्येक ८ गुन्ह्यात शिक्षा) तसेच सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे या श्रेणीत बिडकीन पोलिस ठाणे, एपीआय संतोष माने यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड उपस्थित होते.

गावठी पिस्टलसह चार लाखांचा ऐवज जप्त

पिशोर ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करत ३, लाख ९६ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त करत एक गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे हस्तगत करून आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. ही कारवाई एपीआय कोमल शिंदे, उपनिरीक्षक एस.डी.बडे, के. एफ. पटेल, एस. डकले, के. पी. म्हस्के, एल. टी. नागलोत यांच्या पथकाने केली. याशिवाय कन्नडचे एसडीपीओ मुकुंद आघाव, निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्यासह राजीव तळेकर, प्रदीप ठुबे, सतीश बडे, महेश घिर्डीकर, राम म्हात्रे, वसावे, कुलकर्णी यांनी इप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस (I.E.D) मिळून आल्यानंतर तो निकामी करत आरोपीला अटक केली होती.

बिडकीन ठाण्याचे एपीआय संतोष माने, जगदीश मोरे, विजय जाधव, नरेंद्र खंदारे, राहुल गायकवाड यांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली होती. शिल्लेगाव ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, श्रीकृष्ण दाणी, संतोष धाटबळे, उमेश गुडे, हनुमंत सातपुते, विनोद पवार, रमेश अवसनवाड यांच्या चमूने खुनाचा गुन्हा आणि इलेक्ट्रिक मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. एमआयडीसी वाळूज ठाण्याचे सहायक निरीक्षक भागवत नागरगोजे, सिंघल, घाटेश्वर, उगले यांनी खुनाचा गुन्हा उघड केला. सोयगाव ठाण्याचे सहायक निरीक्षक सुदाम शिरसाठ, उपनिरीक्षक सतीश पंडित, ज्ञानेश्वर सरताळे, राजू बरडे यांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल गौरव करण्यात आला.

उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करून व गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत आरोपींना अटक केल्याबद्दल, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना फिरती ट्रॉफी तसेच प्रशस्तिपत्रक देऊन गौरव केला. यामुळे सर्वांना निश्चितच प्रोत्साहन व स्फूर्ती मिळणार आहे

- मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com