Murder News : पत्नी आणि मुलानेच दगडी वरवंटा डोक्यात घालून घेतला जीव

Family Crime : पत्नी आणि मुलाच्या विरुद्ध फिर्याद दाखल ; घरगुती कारणावरून भांडण
 मयत- प्रभाकर पुंजाजी त्रिभुवन
मयत- प्रभाकर पुंजाजी त्रिभुवनesakal

Valuj : घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पत्नी व मुलाने संगणमत करून 62 वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी बसण्याचा पाट व दगडी वरंवटा मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. ही घटना गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान वाळूज परिसरातील जोगेश्वरी झोपडपट्टी येथे घडली.

 मयत- प्रभाकर पुंजाजी त्रिभुवन
Narendra Dabholkar Murder Case: ‘हिंदू दहशतवादा’चे कुभांड रचणाऱ्यांचा पराभव,सनातन संस्थचे प्रवक्ते अभय वर्तक यांचा दावा

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रभाकर पुंजाजी त्रिभुवन वय 62 वर्षे हे पत्नी अनिता व मुलगा दिलीप यांच्यासह जोगेश्वरी झोपडपट्टी ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे राहत. घरगुती कारणावरुन गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 11 वाजे दरम्यान प्रभाकर व त्यांची पत्नी अनिता प्रभाकर त्रिभुवन यांचे जोरजोरात भांडण झाले.

भांडणाचा आवाज मोठा असल्याने शेजारी घरासमोर जमा झाले. त्यामुळे शेजारी राहणारे बबन त्रिभुवन, सोमनाथ त्रिभुवन, सोनाली त्रिभुवन, पाटील बाई यांनी त्यांना भांडण करु नका. असे सांगत होते. परंतु ते ऐकण्याचे तयारीत नव्हते. मारहाण करित असताना अनिता हीने प्रभाकर यांच्या डोक्यात लाकडी बसण्याचा पाट व दगडी वरवंटा डोक्यात मारला.

त्यामुळे डोक्याला जखम होवुन रक्त निघाले. त्यानंतरही मारहाण सुरूच होती. त्यामुळे प्रभाकर हे जमिनीवर जखमी होवुन बेशुद्ध पडले. त्यांना दवाखाण्यात घेवुन जावु दिले नाही. त्यामुळे ते रात्रभर बेशुद्धच होते.

 मयत- प्रभाकर पुंजाजी त्रिभुवन
Sitapur Murder Case: चिमुरड्यांना छतावरून फेकलं, आईवर झाडली गोळी अन् बायकोला हातोड्यानं..; सीतापुरात 5 जणांची निर्घृण हत्या

पुतण्याने केले उपचारार्थ दाखल -

भांडण झाल्यामुळे चुलता बेशुद्ध आहे. ही माहिती पुतण्या बबन त्रिभुवन यांनी नातेवाईकांना दिली. त्यानंतर त्यांच्या मदतीने बबन त्रिभुवन यांनी प्रभाकर यांना शुक्रवारी (ता.10) रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घाटी घाटी दवाखान्यात दाखल केले. तरीसुद्धा त्यांची पत्नी अनिता व मुलगा दिलीप हे घाटी दवाखाना येथे पाहायला आले नाही.

उपचार सुरू असताना रविवारी (ता.12) रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास प्रभाकर त्रिभुवन हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. याप्रकरणी बबन मुरलीधर त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी अनिता प्रभाकर त्रिभुवन व मुलगा दिलीप प्रभाकर त्रिभुवन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पत्नी व मुलगा दोघांनाही अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com