Chh. Sambhaji Nagar : गृहिणींचे बजेट कोलमडले; वांगे शंभरला किलो, लसणाने केला तीनशेचा आकडा पार

तीन आठवड्यांपासून बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे दर वाढलेले आहेत.
household budget collapse brinjal 100 rs kg garlic cross 300 rs kg food inflation
household budget collapse brinjal 100 rs kg garlic cross 300 rs kg food inflationesakal

जाधववाडी : तीन आठवड्यांपासून बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे दर वाढलेले आहेत. यात वांगे ९० ते शंभर रुपये किलोने विक्री होत आहेत. त्यापाठोपाठ आता टोमॅटो ४० कांदे ४० रुपये किलोच्या घरात गेले आहेत. मेथी, पालकही १५ रुपये जुडीने विक्री होत आहे.

दोन आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने कांदा ४० रुपये किलोने विक्री होत आहे. तर लसूण ३०० रुपये प्रतिकिलोने विक्री झाला. बाजारात नवीन बटाटा आल्यामुळे बटाट्याचे दर २५ ते ३० रुपये किलोने विक्री होत आहे. वांगे १०० रुपये किलो, शेवगा-८०, भेंडी ८०, मिरची ६० रुपये किलोने विक्री झाले.

एक ते सात जानेवारी दरम्यान बाजार समितीत ८ ट्रक मधून २०० क्विंटल बटाट्याची परपेठेतून आवक झाली. त्यासह सफरचंदाची पाच वाहनांतून ९० क्विटंल आवक झाली. जवळपास चार वाहनांतून एक लाख नारळाचा आवक झाली.

यासह पाच मोठ्या वाहनांतून दीड लाख नग अननसाची आवक झाली. तसेच ३० ते ४० वाहनांतून पालेभाज्याही आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सफरचंदाचे दर वाढले

हिवाळ्यात विविध फळांची आवक सुरू होते. यंदाही बाजारात विविध फळांची आवक सुरू झाली. यात काश्‍मीरमधून येणाऱ्या सफरचंदाची आवक जेमतेम होती. फारशी मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी या आठवड्यात केवळ पाच ते सहा ट्रक सफरचंद आणले.

दर २०० रुपये किलोने विक्री होत आहे. मागणी वाढत असूनही जम्मू काश्‍मीर येथेच सफरचंदाची उत्पन्न घटल्यामुळे आवकेवर परिणाम झाला. आणि सफरचंदाची दरवाढ झालेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com