esakal | औरंगाबादकरांसाठी खास महत्त्वाची बातमी 
sakal

बोलून बातमी शोधा

How important is the news for Aurangabad?

रात्रीची वेळी घरात आजारी माणूस असेल किंवा अचानक कोणाला रुग्णालयात न्यायची वेळ आली; तर त्यांच्या तत्परसेवेसाठी मोफत वाहन

औरंगाबादकरांसाठी खास महत्त्वाची बातमी 

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आपल्या राज्यालाही या कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने पूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. 

रात्रीची वेळी घरात आजारी माणूस असेल किंवा अचानक कोणाला रुग्णालयात न्यायची वेळ आली; तर त्यांच्या तत्परसेवेसाठी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेमार्फत मोफत वाहन उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संजय हळनोर यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगीतले. 

हेही वाचाकोरोनाच्या सावटात गुडीपाडवा साजरा

सध्या संचारबंदीच्या काळात रुग्णांना रात्रीच्या वेळी दवाखान्यात नेण्यासाठी वाहन मिळत नाही. रस्त्यावर दूरवर ऑटोरिक्षाही दिसत नाही. मग काय करणार? अशी वेळ कुणावरही येऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत देण्यासाठी जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. 

हेही वाचा - कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात

रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत या संस्थेमार्फत शहरातील प्रवासी वाहन चालकांच्या मदतीने रुग्णांसाठी मोफत ऑटोरिक्षा, कार, जीप व एंबुलेंस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सामाजिक संस्थेमार्फत औरंगाबाद शहरातील गरजू रुग्णांना दवाखान्यात नेण्यास मदत केली जात आहे. शहरातील प्रत्येक भागातील रुग्णांना ही सेवा मिळावी म्हणून त्या-त्या भागातील रिक्षाचालकांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी किंवा अपरात्री शहरातील विविध भागात तत्पर सेवा देण्याऱ्या संघटनेच्या समन्वयकांचे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत. 

तत्परसेवेसाठी मोबाईल नंबर ः 

 • - कामगार चौक, लक्ष्मी कॉलनी (अशोक शहाणे-९८२२३२३१९८) 
 • - शिवाजीनगर- (श्री. कदम- ७७२२०६०६७६) 
 • - कटकट गेट (शेख फिरोज- ९९२१८१७७८६) 
 • - फाजलपुरा (विनोद रोकडे - ७३८५८३२८७०) 
 • - लेबर कॉलनी (आनंद भिसे- ९०२१२४६२११) 
 • - राजेश जाधव (कलेक्‍टर ऑफिस - ९८५०५९०३२२) 
 • - रेल्वे स्टेशन (अश्‍पाक सईद -९८२३८०७९१२) 
 • - हर्सूल सावंगी (दत्ता सरगर - ९७६७९७७३३६) 
 • - बेगमपुरा (सुनील साबळे- ९१५८१४७९०९) 
 • - खोकडपुरा (रवी हाळनोर - ८६६९२७००९९) 
 • - बीड बायपास (अर्जुन राठोड - ८७८८८१७५८९) 
 • - जुना बाजार (सईद जावेद - ९९६०११६९०९) 
 • - हडको (निखिल कुलकर्णी- ९४२०३७६०२७) 
 • - हनुमाननगर (विजय निकम - ९८५१९८७५५५) 
 • - रामनगर (सागर राजपूत- ९५९५०५९५९९) 
 • - जवाहर कॉलनी (लक्ष्मण शेंडगे- ९५९५२२७७७९) 
 • - सादतनगर (मझहर शेख - ९७६३५५५७८१) 
 • - बंन्सीलालनगर (खुशाल लढ्ढा -८३९०५३६१९९) 
 • - ज्योतीनगर (सुदर्शन देशपांडे - ७५१७८७१०७०) 
 • - होळकर चौक गणेशनगर (भाऊसाहेब येळवे - ९८२२८४८७८१) 
 • - कांचनवाडी (बाळु आवसार- ८७८८२९९१९७) 
 • - क्रांतीनगर (राजु साळवे- ९७६४७९९७२०) 
 • - रोशन गेट (शेखजावेद शेख- ९९७०७८७२७३,शेख अब्दुल - ७६२०४२४०७१) 
 • - जय भवानीनगर (सुरेश गायकवाड- ९८२२८७५२४४, लक्ष्मण वाघ -९४२०२४१२१५) 
 • - मुकुंदवाडी (रवि शेळके - ८००७१८००५०, रमेश कोलते - ८२७५२३०२६६) 
 • - मयुरपार्क (सोमनाथ गायकवाड -९६७३०४६९७४, रामेश्वर फुके -९९२२४५३६३२, चरण राजपूत- ८६९८४१५४१५) 
 • - मुकुंदवाडी (ज्ञानेश्वर ठोंबरे - ७७४५०३७०९९, संतोष काळवणे- ९७३०५३०३७७, रविंद्र आढाव- ८८८८०३२६७७) 
 • - गजानन मंदिर परिसर (विश्‍वंभर लांडे - ९८८१८६५१३४, संजय हाळनोर-९०४९५९२३७३, ज्ञानेश्वर हाळनोर- ९०४९१३३७००, लक्ष्मण सोनवणे -९५७९३८८३२०)  
   
loading image