crime
छत्रपती संभाजीनगर - कामाला जातो असे सांगून घरातून निघालेल्या पेंटरला वाहनाने धडक दिली. यात जखमी झाल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची ओळख न पटल्याने तीन आठवडे कुटुंबीयांनी शोध घेतला. पोलिसांनी अनोळखी मृतदेह म्हणून अंत्यसंस्कार केल्याचेही समोर आले. सखाराम चांदणे असे मृत पेंटरचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.