आरटीओच्या मोहिमेत शंभरावर वाहने जप्त

तीन दिवसात दहा लाखापेक्षा अधिक दंडाची वसुली
Hundreds of vehicles seized in RTO operation aurangabad
Hundreds of vehicles seized in RTO operation aurangabadsakal media
Updated on

औरंगाबाद : अनफिट आणि नियम न पाळणाऱ्या खासगी ट्रॅव्‍हल्ससह, स्कूलबस, ट्रक, टेम्पो, पिकअप आणि खासगी अशा शंभरावर वाहनांच्या विरोधात आरटीओ कार्यालयाने विशेष मोहीम राबवून सदर वाहने जप्‍त केली आहेत. कारवाईतून आरटीओ कार्यालयाने कर स्‍वरुपात अंदाजे दोन ते तीन लाख तर दंडापोटी आठ ते दहा लाख एवढा महसूल मिळविला. दंड वसूल झालेल्या वाहनांना सोडण्यात आले आहे.

परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनूसार, औरंगाबादेत आरटीओ कार्यालयाकडून चार ते सहा एप्रिल दरम्यान विशेष मोहीम राबविण्‍यात आली. तपासणी मोहीमेत अनफिट आणि अन्‍य नियम न पाळणाऱ्या खासगी ट्रॅव्‍हल्सह, स्‍कुलबस, ट्रक, टेम्पो, पीकअप आणि खासगी वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. यामध्ये शहरातील नगर हायवे, चिकलठाणा, बीड बायपास रोड, शेंद्रा एमआयडीसी, करमाड आणि जालना रोड या ठिकाणी आरटीओने दोन पथकांच्या माध्यमातून तपासणी केली. पथकांनी अवघ्‍या तीन दिवसात अनेक वाहनांची तपासणी केली. त्‍यात १२० वाहने विविध कारणांसाठी दोषी आढळली.

यामध्ये प्रामुख्याने कर थकविणे, परवाना नसणे, वाहतुकीचे नियम मोडणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि परवानगी नसताना मालवाहतूक करणे आदी कारणांवरून वाहनांवर कारवाई करण्यात येवून ती वाहने जप्‍त आरटीओ कार्यालयाच्‍या परिसरात लावण्‍यात आली होती. कारवाई करण्‍यात आलेल्या १२० वाहनांपैकी आरटीओने १०० वाहनधारकांकडून कर आणि दंडापोटी अंदाजे १० ते १२ लाखांचा महसूल गोळा केला. ही कारवाई प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक निलेश लोखंडे, अविनाश पाटील, योगेश सरोदे, अपर्णा चव्हाण, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विकास डोंगरे, शिवशंकर धोंडे, मकरंद जायभाये, योगेश सापीके, दारासिंग घुनावत, माधवी चत्रे, पूजा कुचे, दिव्या कोळसे आणि चालक संदीप जोंधळे, परमेश्वर डांगे आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com