Beed Crime : शेतात नवविवाहित जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांनी केला होता आंतरजातीय विवाह

ईश्वर बबन गुंड (वय ३४) व ऋतुजा बबन गुंड (२४) यांनी काही महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता.
Crime News Waghluj Village
Crime News Waghluj Villageesakal
Summary

काल सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हे दांपत्य कांदे झाकण्यासाठी शेतात गेले होते.

आष्टी : पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघळूज (ता. आष्टी) इथं मंगळवारी (ता. २३) घडली. पतीचा मृतदेह काल सायंकाळी तर पत्नीचा मृतदेह आज सकाळी आढळला. कडा येथे उत्तरीय तपासणीनंतर दोघांच्या पार्थिवावर वाघळूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईश्वर बबन गुंड (वय ३४) व ऋतुजा बबन गुंड (२४) यांनी काही महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. विवाहानंतर हे दांपत्य मुंबईला गेले होते. तेथून परतल्यावर ते वाघळूज गावात शेती करून उदरनिर्वाह करीत होते. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे.

Crime News Waghluj Village
Sangli : लग्नाळूंना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 65 वर्षाच्या वृद्धासमवेत पीडितेचा दोन वेळा केला विवाह

काल सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हे दांपत्य कांदे झाकण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी उशिरा ईश्वर बबन गुंड यांचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. काही अंतरावरच ऋतुजा बबन गुंड हिचाही अशाच स्थितीतील मृतदेह आज आढळला. दोघांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

Crime News Waghluj Village
Karnataka : भाजपला पुन्हा दणका; गोहत्याबंदी-धर्मांतर कायद्यात होणार बदल; खर्गेंनी दिली महत्वपूर्ण अपडेट

दोघांनी गळफास घेतला की अन्य काही कारण आहे, याचा तपास अंभोरा पोलिस करीत आहेत. दरम्यान, तालुक्यातील चिंचोली येथे काल कर्जाला कंटाळून अंकुश बाबूराव एकशिंगे (४४) या शेतकऱ्याने विष घेऊन मृत्यूला कवटाळले. या घटनेला काही तास उलटताच हा प्रकार उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com