esakal | ‘तिने तालावर नाचायला भाग पाडले’ लिहून प्रियकराची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

‘तिने तालावर नाचायला भाग पाडले’ लिहून प्रियकराची आत्महत्या

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: ‘मी तिच्या प्रेमात अडकलो होतो, तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तिने गैरफायदा घेतला. मला तिच्या तालावर नाचायला भाग पाडले. माझे आयुष्य तिच्या कारणामुळे संपवत आहे’ असा आशय असलेली सुसाईड नोट लिहून ठाण्यातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सातारा परिसरात घडली होती. याप्रकरणी तरुणीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार संजय गायकवाड (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, एका विवाहितेसोबत तुषार गायकवाड याचे प्रेमसंबंध होते. तुषारला ती आवडत होती. मात्र, तिने तुषारला सोबत राहण्यास नकार दिला होता. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात तुषारसोबत तिची भेट झाली नव्हती. सोबत राहत असताना तरुणीने तुषारचा गैरफायदा घेतला. असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचे वडील संजय गोविंद गायकवाड (६०, रा. शिवाजीनगर, ठाणे) यांना २४ जून रोजी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास सातारा पोलिसांनी संपर्क साधून तुषारचा अपघात झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गायकवाड हे तत्काळ शहरात दाखल झाले. त्यानंतर सदर तरुणावर ठाण्यातील शिवाजीनगरात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

हेही वाचा: औरंगाबादेत लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, संजय गायकवाड यांना मुलाच्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये त्याने मृत्यूचे कारण तसेच मोबाइलमध्ये पुरावे असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. त्यावरून शनिवारी गायकवाड यांनी सातारा पोलिस ठाणे गाठत संबंधित तरुणीविरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहेत.

loading image