Ice Cream Industry : आइस्क्रीम उद्योगाचा महाराष्ट्रात झपाट्याने विस्तार; शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी वाढली
Dairy Growth : महाराष्ट्रातील आइस्क्रीम उद्योगाचा झपाट्याने विस्तार होत असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात ३,००० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील आइस्क्रीम उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम, बदलते ग्राहक आणि विविध प्रकारांच्या आइस्क्रीमच्या वाढत्या मागणीमुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल २५०० ते ३००० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.