विद्यार्थी नवउद्योजकांसाठी ‘इग्निशन ४.०’ स्टार्टअप बूटकॅम्प

विद्यार्थी नवउद्योजकांसाठी 
‘इग्निशन ४.०’ स्टार्टअप बूटकॅम्प
Published on: 
विद्यार्थी नवउद्योजकांसाठी ‘इग्निशन ४.०’ स्टार्टअप बूटकॅम्प २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आयोजन; २२ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अटल इनक्युबेशन सेंटरतर्फे ‘इग्निशन ४.०’ या तीनदिवसीय स्टार्टअप बूटकॅम्पचे आयोजन अटल इनक्युबेशन सेंटर येथे करण्यात आले आहे. हा उपक्रम २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, त्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थी, नवउद्योजक, संशोधक आणि प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना या बूटकॅम्पमध्ये सहभागी होता येईल. कल्पनेपासून उत्पादन विकास आणि प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीपर्यंत मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष कार्यशाळा, नमुना उत्पादन निर्मिती आणि गुंतवणूकदारांशी संवादाची संधी मिळणार आहे. पहिल्या दिवशी नवकल्पना, समस्या ओळख आणि डिझाइन थिंकिंगवर भर दिला जाईल. दुसऱ्या दिवशी नमुना उत्पादन, तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, हॅकाथॉन आणि व्यवसाय प्रारूपावर काम होईल. तिसऱ्या दिवशी सादरीकरण कौशल्य, गुंतवणूकदारांसमोर कल्पना मांडणे आणि अंतिम सादरीकरण स्पर्धा होणार आहे. निवड झालेल्या संघांना स्टार्टअपसाठी निधी सहाय्य मिळण्याची संधी असेल. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना ५०० हून अधिक स्टार्टअपशी जोडलेल्या अटल इनक्युबेशन सेंटरच्या नेटवर्कचा लाभ घेता येईल. सामाजिक नवकल्पना, ग्रामीण भागातील स्टार्टअप, स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि सौरऊर्जा या क्षेत्रांतील कल्पनांना प्राधान्य दिले जाणार आहे. हा उपक्रम नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना आणि महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या सहकार्याने राबविला जात आहे. ------ असा करा अर्ज इच्छुकांनी https://aicbamu.accubate.app/ext/form/24232/1/apply या संकेतस्थळावर २२ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करावी. संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन अटल इनक्युबेशन सेंटरने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com