
बजाजनगर : शहरात अवैध धंदे वाढले आहेत. पण, पोलिस ठोस कारवाई करीत नाहीत. ही बाब ‘सकाळ’ने ‘कुठेय पोलिस?’ या वृत्तमालिकेतून अधोरेखित केली. त्यामुळे पोलिस खडबडून जागे झाले असून, वाळूज औद्योगिक परिसरात दुसऱ्या रविवारी (ता. २२) शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका स्क्रॅपच्या (भंगाराच्या) गोदामावर छापा टाकला. साजापूर येथे केलेल्या या कारवाईत नशेच्या गोळ्या असल्याच्या संशयावरून टॅब्लेटची रिकामी पाकिटे आणि स्ट्रिप्स ताब्यात घेतल्या. प्रयोगशाळेत त्यांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई होणार आहे.