
Illegal Gas Cylinder
sakal
गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील भेंडाळा शिवारात टँकरमधून अवैधरीत्या गॅस सिलिंडरमध्ये भरण्याचा अड्डा शनिवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आला. दरम्यान, या प्रकाराचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुणे येथील पत्रकार आणि सामाजिक संघटनेच्या महिला-पुरुषांना अज्ञात गुंडांनी जबर मारहाण केली.